बनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेची महावितरणला धडक..

मनसे कडून महावितरणला खळखट्याक इशारा..

वेंगुर्ला प्रतिनिधी

काही दिवसापासून वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत महावितरण करून मोबाईलवर संदेश येत होते. याच अनुषंगाने आज मनसेच्या शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष सनी उर्फ गोपाळ बागकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला धडक दिली. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्मार्ट मीटर सक्ती नसल्याचे जाहीर करतात तर दुसरीकडे महावितरण मार्फत नागरिकांना स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्य असल्याचे मेसेज पाठवतात. काही ठिकाणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले देखील आहेत. याच विरोधात आज मनसेने महावितरण ला निवेदन देत वेंगुला तालुक्यातील नागरिकांना स्मार्ट मीटर बाबत सक्ती केल्यास इशारा दिला. यावेळी सोबत शहराध्यक्ष सुरज मालवणकर, उपतालुका अध्यक्ष महादेव तांडेल, पवन बागायतकर, मिनीन फर्नांडिस, राहुल गावडे, शहर उपाध्यक्ष प्रथमेश नाईक उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page