सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, वेंगुर्ला येथे ‘पालक दिन’ उत्साहात संपन्न
पालकांचे प्रेम,त्याग,संस्कार आणि मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीत असलेले अनमोल योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल,वेंगुर्ला यांच्या वतीने वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक हॉल येथे ‘पालक दिन’ उत्साहपूर्ण, आनंदी आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी परिषदेचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद…
