सत्ताधारी पक्षाशी निगडित उमेदवार भरती केले जातं असल्याने अधिष्ठातांकडून निवडणूक आचार साहितेचा भंग.?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आईना आचारसंहिता कालावधीत कंत्राटी आऊटसोर्स पद्धतीने कर्मचारी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. संबंधित पुरवठादार कंपनीने मागील महिन्याभरापूर्वी दिलेली उमेदवारांची यादी अचानक रद्द करून मागील आठवड्यात आचारसंहिता घोषित झाल्यानंतर नव्याने यादी बदलण्यात येऊन सत्ताधारी पक्षांशी निगडित मर्जीतील उमेदवारांना नियुक्ती देत हजर करून घेतले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांकडून नोकरीचे एक प्रकारे आमिष देऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला जात असल्याची चर्चा ओरोस हॉस्पिटल परिसरात रंगली आहे. रुग्णालय सेवा अति तातडीची कक्षेत येत असली तरीही मागील दोन महिन्यांपासून कंपनीमार्फत उमेदवारांची केलेली निवडयादत फेरबदल करून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या याद्यांमध्ये फेरबदल करून मर्जीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचे प्रकार मेडिकल कॉलेजमध्ये चालू आहेत. यामध्ये आर्थिक वाटाघा्टींची दाट शक्यता असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी याची गंभीर दखल घेऊन अधिष्ठातांवर कोणती कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतं आहे.
