विद्यार्थ्याला कानाखाली,पाठीवर मारहाण;शिक्षक हेमंत सावंत विरोधात गुन्हा दाखल
विद्यार्थ्याला मारहाण भोवली..! देवगड (प्रतिनिधी) तालुक्यातील एका हायस्कुलमधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या कानाखाली तसेच पाठीवर हाताच्या थापटाने मारहाण करून विद्यार्थ्याला दुखापत करणारा शिक्षक हेमंत प्रताप सावंत विरोधात देवगड पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शिक्षक हेमंत सावंत विरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015…
