सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील वेर्ले सटवाडी येथे सालाबाप्रमाणे वार्षिक श्री देव राणे वस मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजा सोमवार दिनांक ४ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.तरीही या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग जिल्हा बेरोजगार सहकारी संस्था फेडरेशनचे संचालक राजन उर्फ कुशाभाऊ राणे यांनी केले आहे.
धार्मिक कार्यक्रम..
⭕सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायण महापूजा
⭕दुपारी तीर्थप्रसाद व महाप्रसाद
⭕रात्री ८.०० ते ९.०० वाजता भजन
⭕रात्री ठीक ९.३० वाजता श्री देव सातपाटेकर दशावतार नाट्य मंडळ निरवडे यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन करण्यात आले आहे
