“फीट इंडिया” चा संदेश देत सावंतवाडीत ‘भाजपा श्री’ चे उद्घाटन..
पीळदार शरीरयष्टींचा जलवा,युवकांचा उत्साह.! सावंतवाडी प्रतिनिधी पीळदार शरीरयष्टी, दमदार स्नायूंचे प्रदर्शन आणि खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेली दाद अशा उत्साही वातावरणात सावंतवाडीत बहुप्रतीक्षित ‘भाजपा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. भाजपा सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक युवा…
