कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित ‘जिल्हास्तरीय सिंधूसरस व मिनी सरस २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर होणार आहे. २१ मार्च ते २५ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील बचत गटांची उत्पादने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांची मेजवानी जिल्हावासीयांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. श्री. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी खासदार श्री. नारायण राणे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर (भा.पो.से.) उपस्थित राहणार आहेत.
असे असेल कार्यक्रमांचे वेळापत्रकः
२१ मार्च २०२६ (शनिवार)
सकाळी ११ ते २: पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.
दुपारी ३ ते ४: कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यातील महिलांसाठी ‘पैठणी स्पर्धा’ (श्री. नागेश नेमळेकर पुरस्कृत).
सायंकाळी ४ ते ६.३०: जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे ‘डॉग शो’.
रात्री ७ ते १०: ‘समई नृत्य’ (कुडाळ).
२२ मार्च २०२६ (रविवार)
