पिंगुळी पाझर तलावाच्या अतिक्रमणाला अभय कुणाचे? जिल्हाधिकारी,पालकमंत्री आणि आमदारांच्या भूमिकेवर मनसेचे प्रश्नचिन्ह!

कोणत्याही स्वार्थ विना प्रामाणिकपणे जनतेच्या पाठी उभे राहावे:कुणाल किनळेकर

कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हजार वनराई बंधारे बांधल्याचे जाहीर करत स्वतःची पाठ थोपटवून घेणारे जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी पिंगुळी पाझर तलावाला हानी पोहोचवणाऱ्या परप्रांतीय विकासकांच्या बाजूने असल्याचा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा आरोप.

महाराष्ट्र राज्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर झाली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असे असताना देखील निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेला पिंगुळी पाझर तलावावर परप्रांतीय विकासकाकडून होणारे अतिक्रमण सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी डोळे मिटून स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवून देखील जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच लघु पाटबंधारे विभाग साफ दुर्लक्ष करण्यामागे नेमका कोणाचातरी दबाव की आर्थिक प्रलोभन असा प्रश्न जिल्हा वासियांना पडलेला आहे. सदर तलावाच्या अतिक्रमणाबाबत तक्रार केल्यानंतर त्याची मालकी असलेल्या लघुपाटबंधारे विभागाने जाग आल्याचे दाखवत कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ गेले वर्षभर पत्रव्यवहारच केल्याचेच सांगत आहेत. दुष्काळजन्य परिस्थिती असताना सदर तलावामधून परप्रांतीय विकासका मार्फत तेथे अनधिकृत बांधकाम करण्यासाठी तलावातून मोठ्या प्रमाणात विनापरवाना पाणी उस्पा केल्याचे देखील लघुपाटबंधारे अधिकाऱ्यांच्या समक्ष पाहणी दरम्यान आढळून आलेले असताना देखील अद्याप पर्यंत त्यांच्या विरोधात नियमानुसार फौजदारी कारवाई देखील झालेली नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम यांनी मागील महिनाभर तात्पुरते वनराई बंधारे व त्यांच्या मोठा गाजावाजा करत बातम्याही प्रसारित केल्या परंतु गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचं देणं असलेला पिंगुळी पाझर तलाव वाचवण्यासाठी लढत असलेल्या स्थानिक नागरिकांकडे मात्र जाणून-बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवी तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून घेतल्याचे मोठेपणा मारण्यापेक्षा सिंधुदुर्गात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले जलस्त्रोत संवर्धनासाठी कोणत्याही स्वार्थ विना प्रामाणिकपणे जनतेच्या पाठी उभे राहावे असे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page