पशुपैदास क्षेत्रातील कारभारावर ग्रामस्थांचा संताप;१५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा..!
कुडाळ : माणगाव खोऱ्यातील पशुपैदास केंद्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचा आक्रमक भूमिका घेतली असून, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत दिपक जयराम काणेकर, मिलिंद रामा धुरी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात शासकीय जागेतील बेसुमार वृक्षतोड, स्थानिक शेतकऱ्यांना योग्य माहिती व प्रशिक्षण…
