पाचव्या दिवशी पिंगुळी ग्रामस्थांचे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे…

बांधकाम स्थगित ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्या मधील पिंगुळी येथील पाझर तलाव वाचविण्या साठी कुडाळ प्रांत कार्यालया समोर जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर आणि पिंगुळी ग्रामस्थांचे सोमवारपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर आज पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या मान्य करीत लेखी आश्वासनाचे पत्र दिले. तसेच विकासकाला सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले. प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांना लिंबू पाणी दिल्यानंतर उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांनी बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page