भोसले फार्मसी कॉलेजतर्फे सावंतवाडीत जनजागृती रॅली : औषधांच्या पलीकडील आरोग्याची दिशा; फार्मासिस्टच्या भूमिकेचा प्रभावी संदेश
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आज यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सावंतवाडी शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. औषधांच्या सुरक्षित व योग्य वापराबाबत जनजागृती करण्यासोबतच आरोग्यव्यवस्थेतील फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका, जबाबदारी आणि योगदान याबाबतचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. जगन्नाथराव भोसले उद्यान येथून रॅलीला सुरुवात झाली. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई यांनी श्रीफळ वाढवून…
