भोसले स्कूलमध्ये रंगला बालदिन; शिक्षकांच्या कलाविष्कारासह विविध उपक्रम उत्साहात संपन्न
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पंडित नेहरुंच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. सोबतच बालदिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शाळेच्या प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसाठी नृत्य तर माध्यमिक विभागातील शिक्षकांनी समूहगान सादर केले. यावेळी विविध खाद्यपदार्थांच्या व खेळांच्या स्टॉल्सचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. दुपारच्या सत्रात रांगोळी…
