कुडाळ रेल्वे स्थानकावर मधु दंडवते यांना आदरांजली

कुडाळ प्रतिनिधी
राजकारणातील तत्त्वनिष्ठ तपस्वी म्हणजे प्रा. मधु दंडवते. कोकण विकास, कोकण रेल्वे आणि प्रा. दंडवते यांचे अजोड नाते आहे, जेव्हा जेव्हा कोकण विकासाचा विषय येईल, कोकण रेल्वेच्या योगदानाचा विषय येईल तेव्हा कोकण विकास आणि प्रा. मधु दंडवते यांचे नाव दुर्लक्षित करून चालणार नाही. कोकणचा विकास ज्या वेगाने होत आहे. मुंबई आणि कोकणची माणसं त्यांचे आजोड नाते निर्माण झाले आहे, त्याला कोकण रेल्वेने फार मोठा हातभार लावला आहे.

बॅरिस्टर नाथ पै, कोकणी माणसांचं कोकण रेल्वेचे स्वप्न प्रा. मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस या जोडीमुळे शक्य झाले आहे. असे उद्गार बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले. ते प्रा. मधु दंडवते यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना कुडाळ रेल्वे स्टेशन येथे अभिवादन करताना बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये अर्थतज्ञ, समाजवादी विचारसरणीचे लोकनेते, निगर्वी व साधी राहणीमान उच्च विचारसरणी असलेल्या, तात्वनिष्ठ प्राध्यापक मधु दंडवत यांच्या कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला.

प्राचार्य अरुण मर्गज यांनी मधु दंडवते यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत रेल्वेमंत्री, अर्थमंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असतानाच्या त्यांच्या कार्याची उपस्थितांना ओळख करून दिली व रेल्वेच्या विकासातल्या योगदानाचा परिचय करून दिला. व त्यांना अभिवादन करण्यात आले.

विविध रेल्वे स्टेशनमध्ये मधु दंडवते यांच्या प्रतिमेचे अनावरण करून त्यांच्या योगदानाची रेल्वे प्रवाशांना सतत जाणीव करून देण्यासाठी आग्रही असणारे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधु दंडवते यांच्या कुडाळ रेल्वे स्थानकातील व सावंतवाडी रेल्वे स्थानकातील प्रतिमेस पुष्पहार घालून बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक व शिक्षक, विद्यार्थ्यांतर्फे अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे,, कुडाळ रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर सुरेंद्र राजापकर, कोकण रेल्वेचे, रेल्वे कर्मचारी मनोहर चव्हाण, दत्ताराम चव्हाण व विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

याचं बरोबर सावंतवाडी येथील रेल्वे स्टेशन मध्ये मधु दंडवतेच्या प्रतिमेसमोर आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रेल्वे स्टेशन मास्तर दिनेश चव्हाण, रेल्वे कर्मचारी लक्ष्मण परब, बुधाजी परब, सोबत प्रा. परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, प्रसाद कानडे, ज्ञानेश्वर तेली, दिनार गाळवणकर व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

तर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विदयार्थी, रेल्वे प्रवासी यांच्या उपस्थितीमध्ये मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page