साकवांची दुरुस्ती करा, प्रलंबित भात पिकविमा रक्कम द्या,खतांचा पुरवठा करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अकरावीचे वर्ग लवकरात लवकर सुरू करण्याचीही केली मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८६० पैकी ४५८ साकव नादुरुस्त असून साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करावी.खरीप हंगाम २०२४ मधील भात पिक नुकसान भरपाईची २ कोटी ४४ लाख रु. रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी. फळपिक विम्याचे टिगर…
