कुडाळ तालुका शिंदे शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये जाहीर प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी
हरमलकर हे कविलकट्टा विभागातील असुन गेल्या गेल्या वर्षी आम नाईक यांची साथ सोडुन शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करुन कांहीं दीवसापुर्वि कुडाळ तालुका शिवसेना संघटक पदाची जबाबदारी दीलेली असताना कविलकट्टा येथे झालेल्या निलेश राणे यांच्या उपस्थितीत जो प्रवेश झाला त्या प्रवेशाने नाराज झाले होते या शिवाय आमदार वैभव नाईक यांची काम करण्याची पध्दत आणि कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याची पध्दत ही शिंदे शिवसेना पक्षात नाही तसेच आमदार वैभव नाईक हेच या भागाचे आमदार आवश्यक आहेत असे सर्व सामान्य मतदारांचे मत असुन आपण आम नाईक यांच्या नेतृत्वाखाली या पुढे जोमाने कारणार असल्याची भावना श्री हरमलकर यांनी व्यक्त केली यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर यांनी त्यांचे मन वळवुन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची विनवणी केल्यानुसार आज प्रवेश झाला
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतिश सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट,, युवा सेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, सचिन काळप,राजु गवंडे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महेश वेळकर, संतोष पाटील, संदेश प्रभु,आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page