सावंतवाडीत उद्या वाचक स्पर्धा, श्रीराम वाचन मंदिराचे आयोजन…

सावंतवाडी प्रतिनिधी
श्रीराम वाचन मंदिर,सावंतवाडी या संस्थेच्या वतीने उद्या शुक्रवार दि.२२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय :- जयवंत दळवी यांच्या कोणत्याही प्रकारच्या साहित्य कृतीवर विवेचन करणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे नियम व अटी :-

१. वय वर्षे १६ व त्यावरील कोणत्याही स्पर्धकाला स्पर्धेत भाग घेता येईल.

२. दिलेल्या विषयाचे रसग्रहण विवेच (वक्तृत्व) अपेक्षित आहे.

३. वेळ मर्यादा ७ मिनिटे.

४. प्रथम तीन क्रमांकाना रोख रकमेचे पारितोषिक प्रथम क्रमांक रु. ५००/-, द्वितीय क्रमांक रु. ३००/-, तृतीय क्रमांक रु. २००/- आणि प्रशस्ती पत्रक देण्यात येईल.

५. स्पर्धकांनी आपली नावे २१ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत ग्रंथालयात द्यावीत.

६. अधिक माहितीसाठी ७३८५९७५२०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

७. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.

स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे रविवार दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी होणा-या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भाग मिळेल. तरी सावंतवाडी तालुक्यातील अधिकाधिक वाचकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्यवाह श्री. रमेश बोंद्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page