रविंद्र खेबुडकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती…

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आज उशिरा हे आदेश काढले.

जानेवारी महिन्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची शासनाने बदली केली होती. त्यांच्या जागी ३१ जानेवारी २०२४ रोजी शासनाने मकरंद देशमुख यांची नियुक्ती केली होती. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी देशमुख यांनी या पदाचा पदभार स्वीकारला होता. जिल्हा परिषदेवर प्रशासक लागू आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जबाबदारी दुहेरी होते. परंतु देशमुख याना पदभार स्वीकारून १३ महिने झाले तरी त्यांच्याकडून अपेक्षित कारभार हाकला जात नव्हता. त्यातच पालकमंत्री नितेश राणे त्यांच्या कारभारावर तीव्र नाराज होते. त्यामुळे देशमुख यांची उचलबांगडी अपेक्षित होते.

शासनाने सोमवारी आय ए एस अधिकाऱ्यांच्य बदल्या केल्या. त्यात मकरंद देशमुख यांची हापकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली केली आहे. तर त्यांच्या जागी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page