शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार म्हापण गावात असल्याने आदर्श कार्यक्रम घेतला:शिवसेना नेते अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) म्हापण पंचक्रोशीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते असल्यानेच हा भव्य दिव्य व पक्ष विरहित कार्यक्रम झाल्याने एक आदर्श कार्यक्रम संघटनेच्या वतीने घेण्यात आला या बद्दल खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले
म्हापण तीठा येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवजयंती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन म्हापण पंचक्रोशीतील आरोग्य व सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री बंगे बोलत होते यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले म्हापण सरपंच सौ आकांक्षा म्हापणकर व उपसरपंच श्री ठाकुर आणि सदस्य यांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी केल्यानेच गावातील समस्या काही शिल्लक राहिले नाहीत असे सांगून श्री बंगे म्हणाले या गावाने कै एकनाथ ठाकूर यांच्या रुपाने राज्यसभेतील खासदार व थोर अर्थतज्ज्ञ दीला तसेच माजी आमदार कै श्रीकांत सरमळकर तसेच माजी शिक्षण व आरोग्य सभापती विकास गवंडे याच्या सारखी माणसे या गावाने दिली याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगून श्री बंगे म्हणाले या पंचक्रोशीत देव माणुस म्हणुन डॉ दीपक ठाकुर यांचा सन्मान केलात त्याबद्दल आपणाला खूप बर वाटल असेही श्री बंगे यांनी सांगितले
यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांनीवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी केळुस सरपंच श्री योगेश शेट्ये दै तरुण भारत प्रतिनिधी श्री भुषण देसाई, दै सकाळ चे प्रतिनिधी श्री संदीप चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्र संचालन जेष्ठ दशावतार कला विश्लेषण करणारे श्री वैभव खानोलकर यांनी केले यावेळी अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page