कुडाळ येथे आजपासून होणार ‘शिमगोत्सव’

कुडाळ प्रतिनिधी
महायुतीला साजेसा शिमगोत्सव कार्यक्रम कुडाळ तहसील नजीकच्या मैदानावर २९ व ३० मार्चला आयोजित केला आहे. या शिमगोत्सव दरम्यान होणाऱ्या रॅलीत आमदार नीलेश राणे सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना नेते संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर आदी उपस्थित होते. कुडाळकर म्हणाले, आमदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथील शिमगोत्सव कार्यक्रम भव्यदिव्य असा होणार आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता या महोत्सव कार्यक्रमाचा राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे. ३० रोजी गुढीपाडव्यादिवशी कुडाळ मतदारसंघात प्रथमच हिंदू नववर्षानिमित्त कुडाळमधील जनतेला राणे शुभेच्छा देतील. या दिवशी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत गोव्यातील चार देखावे सहभागी होणार आहेत. शोभायात्रेची सुरुवात कुडाळ कॉलेज चौक येथून होऊन पोलीस ठाणे-जिजामाता चौक-गांधीचौक ते गुलमोहर हॉटेलपर्यंत ती आहे. जिजामाता चौक येथे जाणार आहे. या रॅलीमध्ये आमदार राणे सहभागी होणार आहेत. या महोत्सवात अधिकाधिक राधानृत्ये सादर केली जातील, असेही कुडाळकर यांनी सांगितले.’

कुडाळ प्रतिनिधी
महायुतीला साजेसा शिमगोत्सव कार्यक्रम कुडाळ तहसील नजीकच्या मैदानावर २९ व ३० मार्चला आयोजित केला आहे. या शिमगोत्सव दरम्यान होणाऱ्या रॅलीत आमदार नीलेश राणे सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना नेते संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर आदी उपस्थित होते. कुडाळकर म्हणाले, आमदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथील शिमगोत्सव कार्यक्रम भव्यदिव्य असा होणार आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता या महोत्सव कार्यक्रमाचा राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे. ३० रोजी गुढीपाडव्यादिवशी कुडाळ मतदारसंघात प्रथमच हिंदू नववर्षानिमित्त कुडाळमधील जनतेला राणे शुभेच्छा देतील. या दिवशी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत गोव्यातील चार देखावे सहभागी होणार आहेत. शोभायात्रेची सुरुवात कुडाळ कॉलेज चौक येथून होऊन पोलीस ठाणे-जिजामाता चौक-गांधीचौक ते गुलमोहर हॉटेलपर्यंत ती आहे. जिजामाता चौक येथे जाणार आहे. या रॅलीमध्ये आमदार राणे सहभागी होणार आहेत. या महोत्सवात अधिकाधिक राधानृत्ये सादर केली जातील, असेही कुडाळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page