हुमरमळा (वालावल) गावातील गरीबांच्या ड यादीतील ३२ घरांना मंजुरी मिळालीच पाहिजे अन्यथा १ मे रोजी बेमुदत उपोषणास बसणार :श्री अतुल बंगे!

कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने गरीबांच्या घरकुल ड यादी मंजुरीसाठी पाठविण्यात आली परंतु ही यादी जि प सिंधुदुर्ग यांनी गहाळ केलीअसुन अनेक वेळा आश्वासन देऊन सुद्धा या मादीला मंजुरी मिळत नाही म्हणून २५ एप्रिल पर्यंत मंजुरी द्या अन्यथा १ मे रोजी कुडाळ गटविकास अधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण लाभार्थ्यांसहीत बसणार असल्याचे निवेदन वालावल पंचायत समिती मा सदस्य श्री अतुल बंगे यांनी दीले आहे
मातीची घरे पक्की करणे अशा स्वरूपात घरकुलांची ड यादी पाच वर्षापूर्वी हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ यांचे कडे पाठविली होती किमान ३२ लाभार्थी आज पर्यंत वंचित राहीले असुन अनेक वेळा जिल्हा परिषदे समोर लाभार्थ्यांना घेऊन आंदोलने केली परंतु आश्वासनापलीकडू काहीच झाले नाही, यादी गहाळ झालेली हुमरमळा वालावल एकमेव ग्रामपंचायत असुन आमच्या गावातील लाभार्थी यांना वंचित ठेवुन फक्त ओबिंसिंना चार घरकुले मंजुर केली असुन ओपन वाल्यांवर अन्याय का केला असा सवाल श्री बंगे यांनी करुन ३२ घरकुल ड यादी २५ एप्रिल पर्यंत मंजुरी मिळावी अन्यथा १ मे रोजी कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर लाभार्थी सहीत बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी कुडाळ यांना श्री बंगे यांनी दीले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page