३५ वर्ष गोमांसाचे विक्री करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला तडीपार करा,

अन्यथा हिंदू बांधव रस्त्यावर उतरेल, त्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील

सिताराम गावडे:मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेणे आवश्यक आहे

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहरात गेली 35 वर्षे गो मांसाची विक्री करणाऱ्या त्या आरोपीला वाचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने हिंदू बांधवांना गोवले जात असून खोटी विनयभंगाची तक्रार आरोपीच्या बहिणीकडून देऊन हिंदू समाज बांधवांच्या तरुणांना नाहक गोवले जाण्याचा प्रयत्न होत असेल तर आतापर्यंत शांत असलेला हिंदू समाज रस्त्यावर उतरेल याला पोलीस व प्रशासन जबाबदार राहील, असा आक्रमक इशारा सकल हिंदु समाज बांधवांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. त्या आरोपीला तडिपार करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर हिंदू समाज बांधवांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस कृतिका कोरगावकर, श्रद्धा धारगळकर, सुनील पेडणेकर, अजित सांगेलकर, महेश पांचाळ, अॅड राजू कासकर, अमोल साटेलकर, बंटी जामदार यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सीताराम गावडे म्हणाले गेली 35 वर्षे सावंतवाडी शहरांमध्ये विक्री गोमांस विक्री करणाऱ्या या आरोपीने कोठे विकले जाते यामागील सूत्रधार कोण याचा शोध घेणे आवश्यक आहे दरम्यान बेळगावच्या अधिकृत कत्तलखान्यातून हे मांस आणले जात असल्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले हे करत आहेत ते चांगले काम करत असल्याचे गावडे यांनी सांगितले मात्र हे मांस नेमके कुठल्या हॉटेलमध्ये दिले जात होते याचाही शोध घेणे आवश्यक आहे. तर हा प्रकार उघड केला म्हणून या प्रकरणात आमच्या हिंदू बांधवांना नाहक खोट्या केसेस मध्ये गोवल्यास आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला.

गाय ही हिंदू ची माता आहे. तिची हत्या करून मांसाची वाहतूक व विक्री करणारी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे. या प्रकारामुळे शहरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा माजी नगरसेवक यशवंत उर्फ सुनील पेडणेकर यांनी यावेळी बोलताना दिला.
सावंतवाडी हे शांत व सुसंस्कृत शहर आहे या शहरात सर्व जाती धर्म एकत्र नांदत असताना ही विकृती पुढे येऊ देणार नाही. आरोपीला कोण वाचवत असेल आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला. दुकानावर धाड घातल्यानंतर त्याठिकाणी चिकन कसे आढळते ? म्हणजे आधीच घाडीची खबर मिळाली होती कोणी दिली? याचा शोध घ्यावा असे ही पेडणेकर यांनी सांगितले.

आमच्या हिंदू तरूणांवर नाहक गोवल्यास एका पाठीशी ५०० हिंदू भगिनी उभ्या राहतील.!

या प्रकरणांमध्ये हिंदू तरुणांना नाहक गोवल्यास महिला भगिनी त्यांच्या पाठीशी राहिल असा इशारा हिंदू समाज महिला भगिनी कृतिका कोरगावकर यांनी दिला आहे. एका युवकाच्या पाठीशी ५०० महिला भगिनींची ताकद उभी करू असा इशारा त्यांनी दिला. तर या प्रकरणीयेत्या सात दिवसांतआरोपीला कडक शिक्षा न झाल्यास हिंदू महिला भगिनी रस्त्यावर उतरू, असाही इशारा त्यांनी दिला.

मग पोलीस तपासणी नाकी काय कामाची.?

गेली 35 वर्षे गोमांस सातत्याने सावंतवाडी शहरात पोलीस तपासणी नाक्यावरून येत असताना पोलिसांनाही एकदाही याबाबतची माहिती मिळालेली नाही? ही आश्चर्याची गोष्ट आहे ही तपासणी नाकी काय कामाची ? असा सवाल सिताराम गावडे यांनी केला असून ही पोलीस नाकी काय केवळ हप्ते मिळवण्यासाठी आहेत काय? असाही सवालही त्यांनी उपस्थित केला. जे काम पोलिसांनी करायला हवे ते काम आमच्या हिंदू बांधव करीत आहेत पोलिसांनी जर हे काम केले असते तर हे प्रकार पुन्हा घडला नसता, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page