पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसे कडून स्वागत

कायदा – सुव्यवस्था आणि अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला ग्वाही.

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. या भेटीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाने पूर्णपणे बंद झालेले मटका व दारू धंदे पुन्हा जोमाने चालू झाल्याचे नवीन पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पोलीस कारवाई करतात पण हि लाॅबी पोलिसांना जुमानत नाही. यावर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी अमली पदार्थांची तस्करी यावर कायमचा बंदोबस्त घालण्यासाठी विशेष पथक नेमून कारवाई करावी, प्रार्थना स्थळावरील भोंगे बंद करावे, अशा मागण्या ,चर्चा मनसेतर्फे करण्यात आल्या . आपली कारकीर्द लक्षात रहावी, लोकाभुमिक, आणि निष्पक्ष पाती राहावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या .
हे सर्व विषय गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी सूचना आणि मदत करण्याचे आवाहन केले.या वेळेस जिल्हाध्यक्ष धीरज परब, अनिल केसरकर, उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर, हेमंत जाधव ,सुरज पुजारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page