जिद्द,चिकाटी व सातत्यपूर्ण परिश्रमाने स्वप्न साकार करा:सुनील राऊळ

कलबिस्त हायस्कूलच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

सावंतवाडी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मधील कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी सैनिक नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक स्कूलचे अध्यक्ष तथा सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ उपस्थित होते. यावेळी श्री. राऊळ यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात नेहमी मोठी स्वप्ने पाहा, ती साकार करण्यासाठी जिद्द, चिकाटी व निरंतर मेहनत करा. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या प्रगतीसाठी करा!,” असे मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांच्या व प्रशालेच्या सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी बद्दल अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळा व संस्थेला आपण नेहमीच सहकार्य करण्याचे जाहीर केले.

यावेळी व्यासपीठावर सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, कलंबिस्त हायस्कूल संस्था सचिव यशवंत राऊळ, संस्था संचालक कॅप्टन सुभाष सावंत, सूर्यकांत राजगे, कलंबिस्त हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष तथा सैनिक पतसंस्था सहव्यवस्थापक प्रल्हाद तावडे, मडुरा हायस्कूलचे माजी शिक्षक प्रताप परब सर, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, पालक शिक्षक संघ सदस्या सविता ठाकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलंबिस्त हायस्कूल मधील एस्.एस्.सी. परीक्षेत प्रशालेत तसेच सांगेली केंद्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त कु. तनिषा संतोष ठाकर (९०%), प्रशालेत व सांगेली केंद्रात द्वितीय क्रमांक प्राप्त कु. श्रावणी राजन सावंत (८९.८०%), तृतीय क्रमांक प्राप्त-कु. मानसी दशरथ सावंत (८७.६०%) तसेच इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी कु. हर्षा एकनाथ राऊळ व मराठी विषयात सर्वाधिक गण पाप्त करणारी क मयरी संतोष

वार्षिक परीक्षेत इ.५वी ते ९वी तील प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही शाळा व संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page