सहकार मंत्रालय स्थापना दिनांचे औचित्य साधून कार्यक्रम
माणगाव ०६ जुलै
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, शाखा-माणगाव यांच्या वतीने सहकार मंत्रालय स्थापना दिवस 06 जुलै चे औचित्य साधून वृक्ष लागवड कार्यक्रम श्री देवी जय भीम जय यक्षिणी माध्यमिक विद्यालय,बेनवाडी, माणगाव येथे राबविण्यात आला. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त वीस सुपारी झाडे लावण्यात आली.
याप्रसंगी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य संचालक चंद्रशेखर जोशी शाखा- अध्यक्ष माणगाव शिवराम गणेश जोशी तसेच सदस्य अनंत मासंग,कृष्णा परब,दशरथ चव्हाण तसेच शाखा व्यवस्थापक श्री. राजेश पास्ते आणि कर्मचारी वर्ग तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. साटम सर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. सैनिक नागरी पतसंस्था, शाखा- माणगाव या स्थानिक समितीकडून शालेय पोषण आहार बनवण्यासाठी मिक्सर देण्यात आला.
