जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची टीम गावागावात पोहचवा:आमदार निलेश राणे
कुडाळ-मालवण तालुक्यातील प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेत चर्चा केली .सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाले मात्र ही कामे नीटनेटकी झाली नाही की ते कामे पूर्ण झाली मात्र त्यांचे बिल ठेकेदारांना मिळाले नाहीत तर दिले मिळालेत पण झालेली कामे योग्य नाही आदी विषय आमदार निलेश राणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडले आणि जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामांचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय बैठक घ्या व सर्व कामे त्वरित व जलद गतीने पूर्ण व्हावीत यावर भर देण्याच्या सूचना केल्या.
जी प शाळांच्या दुरुस्ती तत्काळ कराव्या,कारण वर्गखोल्यांची अवस्था एकदम बिकट आहे,शाळेत पावसामुळे गळती लागली आहे.त्यामुळे वर्गखोल्या एकीकडे व मुल कुठेतरी झाडाखाली शिक्षण घेत आहेत ,अशी परिस्थिती आहे .याकडे लक्ष वेधले.तर कोकणातील महत्वाचा उत्सव गणेशोत्सव जवळ आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची खड्डे बुजवणे व डागडुजीआदींसह विविध विकास कामांबाबत ही सविस्तर चर्चा केली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालय येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासोबत सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख संजू परब,दादा साईल, काका कुडाळकर, बाबा परब आदी उपस्थित होते.
गणपतीपूर्वी रस्ते होणार खड्डेमुक्त रस्ते –
जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत हे रस्ते गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे मुक्त करण्यासाठी सुमारे चार कोटी रुपये एवढा खर्च असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर यांनी सांगितले यावर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांसह आम्हा दोन्ही आमदारांकडून प्रत्येकी एक एक कोटी रुपये घेऊन हे सर्व रस्ते गणपतीपूर्वी खड्डे मुक्त करावेत असे सांगत आपल्या आमदार निधीतून ₹१ कोटीची रक्कम जिल्हा परिषदेला प्रदान केले. यामुळे जिल्ह्यातील रस्ते खड्डे मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ३ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही हा पगार त्यांना गणपतीपुळे मिळावा यासाठी प्रयत्न करा असे आमदार राणी यांनी सुचविले यावर प्रलंबित पगार देण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून ४ दिवसांत अदा करण्यात येतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
