रणझुंजार मित्र मंडळ आयोजित आणि रुपेश पावसकर पुरस्कृत नेरूर येथे नारळ लढवणे स्पर्धा

कुडाळ प्रतिनिधी
रणझुंजार मित्र मंडळ आणि रुपेश पावसकर पुरस्कृत नेरुर येथे भव्य दिव्य अशी नारळ लढवणे स्पर्धा रविवार दिनांक 10.08.2025. रोजी नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर येथे सायंकाळी ठीक (4) चार वाजता आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 5000 रुपये तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 3000 रुपये उद्योजक श्री रुपेश पावसकर यांच्याकडून पुरस्कृत केले आहे. यासाठी जास्तीत जास्त नारळ लढविणाऱ्या स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रणझुंजार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. नारळ लढवणे स्पर्धेत संपर्कासाठी 9370983003 या नंबर वरती संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page