वन्यजीव सप्ताह निमित्त सायकल रॅलीचे आयोजन..

वनपरिक्षेत्र कुडाळ व सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव विषयी जनजागृती

काल दिनांक 5 ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह निम्मित वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ व सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीवा विषयी जनजागृती व पर्यावरण पूरक जीवनशैली विषयी चा संदेश समाजात पोहचावा या करिता वनपरिक्षेत्र कार्यालय कुडाळ ते नरेंद डोंगर सावंतवाडी या दरम्यान सायकल रॅली काढण्यात आली,सदर कार्यक्रमास कुडाळ सायकल असोसिएशन चे रुपेश तेली व त्याचे सहकारी उपस्थित होते.तसेच मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री मिलिश शर्मा IFS,यांचे मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक डॉ.सुनील लाड, सहा. वनसंरक्षक श्री.वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल श्री.संदीप कुंभार, सुहास पाटील तसेच कुडाळ आणि सावंतवाडी रेंज चे सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक यांच्या सहभागातून सायकल रॅली काढण्यात आली.सहा. वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांनी उपस्थितांस वन्यजीव व त्यांचे आश्रयस्थानांचे जतन व संवर्धन करणेबाबत मार्गदर्शन केले.अशाप्रकारे वन्यजीव सप्ताह साजरा करणेत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page