मंत्री नितेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार

जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता

जिल्हा संघटक अंकुश जाधव यांची माहिती

कणकवली प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा ऐतिहासिक शासकीय निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळे जाहीर झाला आहे. याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह जिल्हा पत्रकार भवन सिंधुदुर्गनगरी येथे दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री राणे यांचा नागरी सत्कार शनिवार 8 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र अपरिहार्य कारणामुळे शनिवार 8 नोव्हेंबर रोजी आयोजित पालकमंत्री राणेंचा नागरी सत्कार समारंभरविवार 9 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा संघटक अंकुश जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page