वांद्रे (पू) गांधीनगरमध्ये मा.आम. वैभव नाईक यांनी “डोअर टू डोअर” मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी

शिवसेना उमेदवार सौ. रोहिणी कांबळे यांना निवडून देण्याचे केले आवाहन; मतदारांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

मुंबई (प्रतिनिधी)
मुंबई महानगरपालिका निवडणूकितील वांद्रे (पूर्व) गांधीनगर या प्रभाग क्र. ९३ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ. रोहिणी योगेश कांबळे यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी वांद्रे (पूर्व) गांधीनगर भागात डोअर टू डोअर मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांना मतदारांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला.सौ. रोहिणी कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन वैभव नाईक यांनी मतदारांना केले. याप्रसंगी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page