कणकवली प्रतिनिधी
शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.३१/१/२०२६ ते ७ मार्च २०२६ पर्यंत विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साजरी करण्यात येणार असुन, संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा.श्री.मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिरवंडे, मु.पो.भिरवंडे, ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग येथील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती महोत्सव उत्साहात पार पडला.
प्रसंगी,आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला, स्पर्धेमध्ये कुमारी.प्राप्ती सतिश सावंत प्रथम क्रमांक , कुमारी.नंदिता प्रविण कदम द्वितीय क्रमांक तर कु.हार्दिक हेमंत सावंत यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच, कार्यक्रमात शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना अभिनेते श्री. श्रमेश बेटकर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
व संस्थेच्या पुढील शिवजयंती विशेष कार्यक्रमात देखील अभिनेते श्री.श्रमेश बेटकर यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे.
त्याप्रसंगी,प्रमुख उपस्थिती म्हणुन श्री.अजित सावंत साहेब (पत्रकार दै.पुढारी), श्री.सतिश रोहिदास सावंत साहेब (अध्यक्ष -शाळा व्यवस्थापन समिती) श्री.जगन्नाथ अंकुश घाडीगांवकर सर (मुख्याध्यापक)
श्री.लक्ष्मण मधुकर पावसकर सर (सहाय्यक शिक्षक)
श्री.विजय मनोहर मेस्त्री सर (सहाय्यक शिक्षक) तसेच संस्थेच्या सचिव सौ.प्रीती गुरव, खनिजदार श्री.स्वप्नील गोसावी,श्री.रोहित बेंडल,श्री.अभिजित गोसावी,श्री.अविनाश साटले आदी पदाधिकारी उपस्थिती होते.
संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री.मयुर गोसावी यांनी विद्यार्थांना पुढील शालेय वाटचालीस शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले व महाराष्ट्र गीताने सांगता करत कार्यक्रम संपन्न झाला.
शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्था रजि.(महाराष्ट्र) च्या वतीने भिरवंडे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती महोत्सव..
