कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..

नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ. निलेश राणे यांनी दिले आदेश.

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील
सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल प्रभाकर जळवी यांनी आज दिनांक 26.03.2026 रोजी कुडाळ – मालवण चे आमदार श्री. निलेश राणे यांना निवेदन देत चर्चा केली. आणि सदरचा झोन लवकर ऊठवावा असे सांगितले. तसेच या निवेदनाची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंच्यायत कार्यालयातील भेटी दरम्यात या विषयी कुडाळ न. प. चे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करत त्यांना आमदार निलेश राणे यांनी सूचना करत सदरचा झोन उठवण्यासाठी कार्यवाही करा असे आदेश कुडाळ नगरपंच्यायत च्या मुख्यधिकारी यांना दिले. त्यामुळे आता कविलकाटे येथील महसूली गावातील जमिनीवर लागलेला ग्रीन – झोन पुढील काही महिन्यात उठणार अशी आशा आहे.

गेली कित्तेक वर्षे कुडाळ नगरपंच्यायत हद्दीतील कविलकाटे १. नंबर वॉर्ड मधील शेतकरी आणि नागरीकांची प्रमुख्याने आग्रहाची मागणी अशी आहे कि, “आमच्या कविलकाटे येथील जमिनीवरील ग्रीन झोन ऊठवावा ” परंतु हा झोन उठत नसल्याने आज समिल जळवी यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. कुडाळ शहरातील या महसूली गावात लोकांच्या जवळपास 60% जमिनीवर ग्रीन झोन लागलेला आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत ही गंभीर बाबा आहे.

कविलकाटे येथे ग्रीन झोन लागल्यामुळे गावातील

लोकांना घर बांधणी करणे, घर दुरुस्ती करणे, घरापर्यंत वीज घेणे तसेच घरासाठी बँकेकडून लोन घेणे, नवीन घरासाठी घर नंबर घेणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे यातील कोणत्याच प्रक्रियेत नागरिकांना सहभागी होता येत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी, तसेच नागरिक या ग्रीन झोनला त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. काही महिन्यापूर्वी कुडाळ नगरपंच्यायत च्या मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून काही पुढील कार्यवाही किंवा कोणतीही हालचाल झाल्याची दिसत नसल्याने कुडाळ मधील एका कार्यक्रमा दरम्यान समिल जळवी यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन सदर ची परिस्थिती सांगितली आणि त्यांच्याकडे लेखी निवेदन देत कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांना निदर्शनास आणून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page