राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..
ओरोस प्रतिनिधी
दैनंदिन शैक्षणिक कामकाज सांभाळून BLO च काम करणाऱ्या शिक्षक बांधवा शिक्षक समिती देवगड अध्यक्ष श्री. जयेंद्र चव्हाण यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली देवगड मान प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचा तीव्र निषेद करत आज राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन अपशब्द वापरून शिवीगाळ करणाऱ्या प्रांतअधीकाऱ्याला कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी निवेदन देताना अध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस राजन वालावलकर, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, राज्य पदाधिकारी सचिन मदने व नामदेव जांभवडेकर, देवगड अध्यक्ष जयेंद्र चव्हाण , संदिप मिराशी, कणकवली अध्यक्ष सुशांत मर्गज , कुडाळ शिक्षक नेते प्रसाद वारंग, जगदीश गोगटे, श्रीकृष्ण कांबळी, आपा सावंत, संतोष तेर्से, ईश्वरलाल कदम, संजय तांबे, संतोष कुडाळकर, सचिन पवार, संभाजी पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
