माणगाव प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माणगाव विभागाची बैठक जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे पार पडली.यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना शिवसेना संघटना बांधणीवर भर देण्याबाबत मार्गदर्शन केले. येणाऱ्या निवडणुकीत जोमाने काम करून पुन्हा एकदा माणगाव ग्रामपंचायतीवर भगवा फडकवूया असा निर्धार यावेळी करण्यात आला.
तसेच या बैठकीत माणगाव विभाग संघटकपदी बापू बागवे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्य,गटनेते योगेश धुरी,माणगाव विभागप्रमुख एकनाथ धुरी, उपविभाग प्रमुख शैलेश विर्नोडकर, शहर प्रमुख सचिन भिसे, सरपंच सौ. मनीषा भोसले, उपसरपंच संदीप सावंत ,ग्रामपंचायत सदस्य सौ. ईश्वरी सावंत, सौ अनुष्का तेली ,सौ. दर्शना पेडणेकर ,तेजस्विनी नाईक सौ. प्रीती आडेलकर , अवधूत गायचोर ,बंटी भिसे, बाबुराव कदम ,नानेली ग्रामपंचायत सदस्य विनय कदम, नानेली शाखाप्रमुख तेजस धुरी, माजी सरपंच बच्चू नाईक, युवा सेना विभाग संघटक सचिन तेली प्रशांत वारंग,रोहित धुरी, सागर घाडी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माणगाव विभाग संघटकपदी बापू बागवे यांची निवड
