काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या! DBT सीडिंग पूर्ण झालेल्यांची प्रलंबित रक्कम तातडीने जमा करा
पासबुकच्या झेरॉक्स प्रती घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट पैसे येण्याची अपेक्षा; DBT प्रक्रियेची माहिती नसल्याने काहींचे पैसे अडकले, आता सीडिंग पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची अपेक्षा दोडामार्ग प्रतिनिधी तालुक्यातील काजू आणि आंबा बागायतदारांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, यासाठी शेतकऱ्यांकडून बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रती मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपल्या पासबुकवरील बँक खात्यातच नुकसानभरपाईची रक्कम जमा…
