भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची कमिन्स व सिप्लामध्ये निवड
सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ८९ विद्यार्थ्यांची कमिन्स व सिप्ला या नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे. डिझेल इंजिन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कमिन्स मध्ये ५७ तर औषध निर्मितीसाठी प्रसिद्ध सिप्लामध्ये ३२ विद्यार्थ्याची निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी कॉलेजच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे आहेत. इंटरव्ह्यू कमिन्सच्या पुणे येथील व…
