गुणवंतांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा, प्रशासकीय सेवेत समाजाचा ठसा उमटवा! प्रा. रुपेश पाटील यांचे तरुणाईला आवाहन
बांदा प्रतिनिधी “मराठा हे केवळ एक नाव नसून ते एक व्रत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा जपत समाजाने प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत. समाजातील गुणवंतांच्या यशाचा आदर्श नव्या पिढीने डोळ्यांसमोर ठेवावा. तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे वळून प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवावा. समाजातून गुणवत्तापूर्ण अधिकारी निर्माण होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे,” असे प्रेरणादायी…
