जिल्ह्यातील अनधिकृत धंद्यावरून आमदार निलेश राणे आक्रमक.

दोन दिवसात विशेष पत्रकार परिषद घेत खुलासा करणार:पोलीस अधीक्षकांवर पाठिंबा देत असल्याचा थेट आरोप..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध आणि अनाधिकृत धंद्यावरून शिवसेना कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत.अनधिकृत धंद्यांना थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पाठींबा मिळत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. दोन दिवसात विशेष पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.

आमदार निलेश राणे पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे करणार आहेत. अवैध धंद्यामुळे सर्व सामान्य नागरिक वर्ग त्रस्त आहेत.आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page