दुचाकी गाडीने अचानक रस्त्यावर घेतली पेट;ज्युपिटर पूर्णपणे जळून खाक
कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील हळवल फाटा येथे वागदेच्या दिशेने जाणाऱ्या ज्युपिटर दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. भर रस्त्यात दुचाकीमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर परिसरात काही नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी…
