वाहून गेलेल्या त्या युवकाचा अद्याप शोध नाही
कुडाळ : तालुक्यात माणगांव खोऱ्यातील वसोली सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर अमित मोहन धुरी (३०, या. माणगांव धरणवाडी) व सखाराम शंकर कानडे (६३, रा. माणगांव डोबेवाडी) हे दोघेही सोमवारी रात्री ८ वा. च्या सुमारास स्पेल्डर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवाने सखाराम कानडे यांना झाडाचा आधार मिळाला व ते बाहेर आल्याने बचावले. या घटनेची माहिती मिळताच…
