एका मद्यधुंद वाहन चालकाने अक्षरश: धिंगाणा घालत चार ते पाच वाहनांना दिली धडक
दोडामार्ग मधील घटना;जाब विचारणाऱ्याला बेदम मारहाण दोडामार्ग प्रतिनिधी दोडामार्ग शहरातील आठवडा बाजाराच्या गर्दीत रविवारी सायंकाळी एका मद्यधुंद वाहन चालकाने अक्षरशः धिंगाणा घालत चार ते पाच वाहनांना धडक दिली. एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला संबंधित चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सायंकाळी ७.३५ वा. च्या सुमारास घडली. या घटनेमुळे बाजार परिसरात काही…
