सावंतवाडीच्या पहाटे सुरांची बरसात! ‘सुरमयी दिवाळी पहाट’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी ही सिंधुदुर्गची सांस्कृतिक राजधानी! आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिपादन सावंतवाडी प्रतिनिधी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्तिसंगीताचे स्वर, नाट्यसंगीताची भावस्पर्शी लय आणि लोकप्रिय मराठी गीतांची सुरेल बरसात… अशा संगीतमय वातावरणाने सावंतवाडीकरांची दिवाळी पहाट अधिकच मंगलमय झाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या संगीत सोहळ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला….
