जनआशीर्वाद यात्रा राडा प्रकरण

ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्यासह 12 जणांची निर्दोष मुक्तता.

कुडाळ प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री व सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 2021 मध्ये केंद्रीय मंत्री बनल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनाशिर्वाद यात्रा काढली होती.

ती यात्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुका कार्यालय येथे पोचली असता नारायण राणे यांच्या समर्थकांकडून घोषणा देण्यात आली त्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ मधील कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा व झेंडे दाखवण्यात होते त्या प्रकरणी राजन नाईक यांच्या सह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याप्रकरणी काल कुडाळ न्यायालयाने त्यांची निर्देश मुक्तता करण्यात आली.

यावेळी राजन नाईक यांनी सांगितले की विजय हा नेहमी सत्याचा होत असतो काही पोलिस अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल केले पण न्यायदेवतेने आज आम्हाला निर्दोष मुक्त केले. राजन नाईक यांच्या बाजून अँड. सुधीर राऊळ, अॅड. किर्ती कदम, अँड. प्रदनेश राऊळ यांनी युक्तिवाद केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page