कोंबडीच्या शिकारीच्या नादात बिबट्या विहिरीत पडला; गुदमरून मृत्यू
वेंगुर्ला प्रतिनिधी तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील रहिवासी पत्रकार अजय अशोक गडेकर यांच्या जुन्या घरानजिक असलेल्या विहिरीत सोमवारी मध्यरात्री चक्क बिबट्या विहिरीत पडल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. झाडावरील कोंबडीच्या भक्ष्यासाठी आलेल्या बिबट्याचा लगतच्या विहिरीत पडून पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. याबाबत वनविभाग नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील,…
