आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे उतरले मैदानात..

उद्या श्रावण सोमवारपासून कणकवली,देवगड व वैभववाडी मतदारसंघात तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी या जनसंपर्क अभियानाचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार शुभारंभ..

कणकवली प्रतिनिधी
कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी ५ ऑगस्ट रोजी श्रीदेव कुणकेश्वराची पूजा करून “तुमचा लाडका आमदार ,तुमच्या दारी”या आपल्या जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत.

आ.नितेश राणे आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या कालावधीतील विकास कामांचा लेखाजोखा या निमित्ताने जनतेसमोर मांडणार आहेत.जनतेच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. या काळात तीन तालुक्यातील २६३ गावांना भेटी देण्याचे उ‌द्दिष्ट ठेवण्यात आले असून कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत मतदारसंघातील जनतेशी संवाद साधून आशिर्वाद घेतले जाणार असल्याचे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page