संजय राऊत स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी भाजप मध्ये येण्यासाठी आतुर होता

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट,त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्या अगोदर संजय राऊत ने स्वतःचेच बोलावे

राऊत हा उबाठा चा सुद्धा नाही हे ठाकरेंना २३ नंतर कळेल

कणकवली प्रतिनिधी
स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी संजय राऊत हा भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी किती आतुर झालेला होता. याचे पुरावे मी महाराष्ट्रा समोर देईन तेव्हा संजय राऊत याला तोंड काळ करत फिरावे लागेल.त्यामुळे संजय राऊत ने दुसऱ्यांच्या प्रवेशावर बोलू नये. तू काय दुधा सारखा स्वच्छ नाहीस.तू भेसळ माल आहेस. हे ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांना कळेल की मातोश्री मध्ये येणाऱ्या मध्ये सर्वात मोठा बेइमान संजय राजाराम राऊत आहे.तेव्हा उशीर झाला असेल आणि उरली सुरली उबाठा सुद्धा संपवायाच्या मार्गावर राऊत आहे.हे उद्धव ठाकरेंना 23 तारखे नंतर कळेल. अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
आमच्या कुठल्या नेत्यांच्या घराच्या बाहेर याचा भाऊ आमदार सुनील राऊत चार तास उभा होता. हा जेव्हा जेलमध्ये गेलेला तेव्हा ह्याच्या आमदार भावाने मातोश्रीला कुठली धमकी दिलेली. कसं मातोश्रीला नागडे करू अशी धमकी दिली होती.ही भाषा मातोश्री बद्दल वापरलेली होती.ह्याला भारतीय जनता पक्षामध्ये यायचं होतं. पक्षात घेण्यासाठी भिक मागत होता. आतुर झाला होता. याचा पूर्ण तपशील का महाराष्ट्राला मला दाखवायला लागेल, सांगायला लागेल म्हणून दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्या अगोदर तुझं जनता पक्षामध्ये प्रवेश आमच्या वरिष्ठांनी नाकारल्यामुळे आज तू उबाठा मध्ये बसलेला आहेस त्या बद्दल बोल असे संजय राऊत ला नितेश राणे यांनी सुनावले.
काही करा पण मला भाजपमध्ये घ्या यासाठी किती वेळा सागर बंगल्यावर विनंती केली हे कधी ना कधीतरी आता महाराष्ट्राला सांगायलाच लागेल. भारतीय जनता पक्षाने ही घाण आम्हाला नको म्हणून याच्या ढुंगणावर लात मारली. याच्यासारखा सडका आंबा हा उद्धव ठाकरे बरोबरच बरा दिसतो तो भाजपात नको.अशा पद्धतीची भूमिका आमच्या भाजपच्या सगळ्यात प्रमुख नेते मंडळीनी घेतली होती असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page