दिपक केसरकर सलग चौथ्या वेळी विजयी,विजयाचा ‘चौकार’..

दीपक केसरकर यांना ८१००८ मते मिळाली

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल व येथे काटे की टक्कर होईल असा अंदाज होता. मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही निवडणूक 39899 मताधिक्याने जिंकली व आपल्या विजयाचा चौकार मारला. सलग चौथ्या वेळी या मतदारसंघातून विजयी होऊन दीपक केसरकर यांनी विक्रमाचा नवा इतिहास रचला आहे. सावंतवाडी मतदारसंघात आजपर्यंत असे यश कोणालाच मिळाले नाही. दीपक केसरकर यांच्या विरोधात मातब्बर उमेदवार उभे होते मात्र ते केसरकर यांच्या पुढे निष्फळ ठरले. या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी कडवी झुंज दिली. त्याचा फटका उबाठाचे उमेदवार राजन तेली यांना बसला.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातच्या निवडणुकीचा अंतिम

निकाल जाहीर झाला तेव्हा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दिपक

केसरकर यांना 81008 मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उबाठा

शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांना 41109 मते मिळाली. अपक्ष

उमेदवार विशाल परब विशाल परब यांना 33281 मते मिळाली.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार सौ. अर्चना घारे

यांना 6174 मते, अपक्ष उमेदवार दत्ताराम गावकर यांना 1234 मते,

अपक्ष उमेदवार सुनिल पेडणेकर यांना 899 मते मिळाली तर 2385

जणांनी नोटाचा वापर केला.

दीपक केसरकर यांच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दीपक

केसरकर यांची विजयी मिरवणूक काढून सावंतवाडी शहरात जोरदार

जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page