“आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा” चे आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर व आंबोली केंद्र प्रमुख श्री आर बी गावडे सर यांच्या हस्ते उदघाटन…
आंबोली प्रतिनिधी
आंबोली ग्रामपंचायत च्या वतीने या वर्षी पासून आंबोलतील विध्यार्थी च्या कला गुणांना वाव देण्यासाठी “आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा” चे आयोजित केले.या स्पर्धा मध्ये वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
आंबोली केंद्राचे नाव नेहमीच तालुका व जिल्हा व राज्य स्तरावर शैक्षणिक, क्रीडा व कला गुणां साठी चर्चेत व स्पर्धेत असते.
आंबोली केंद्रात येथील केंद्र प्रमुख श्री आर बी गावडे सर यांच्या संकल्पनेतून आंबोली सारख्या डोंगराल व एका टोकाला असलेल्या गावातील मुलांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे या साठी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर व ग्रामपंचायत आंबोली तील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत च्या माध्यमातून या वर्षी पासून आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा सुरु करण्यात आली.
या स्पर्धे ला आंबोली केंद्रातील सुमारे 80 मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आंबोली केंद्र प्रमुख श्री आर बी गावडे सरांनी व त्यांच्या सहकारी शिक्षकानी केले होते.
या वेळी मच्यावर आंबोली ग्रामपंचायत सदस्य सौ स्वप्नीता कर्पे, श्री काशीराम राऊत, श्री शंकर चव्हाण उपस्थित होते.
या स्पर्धे साठी परीक्षक म्हणून श्री एकनाथ सुतार सर,श्री डॉक्टर चंद्रकांत सावंत सर,श्रीमती वसुंधरा सुर्वे मॅडम उपस्थित होते.
या स्पर्धेवेळी आंबोली केंद्रातील श्री सुलोचना तेरसे मॅडम,
श्री अवधूत जाधव सर,श्री अमोल कोळी सर,श्रीमती हौसा गवस मॅडम,श्रीमती रजिया शेख मॅडम,श्री अनिल कुमार चाळुचे सर, श्री शिरगिरे सर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी आंबोली शाळा व्यवस्तपन सदस्य श्री रवींद्र चव्हाण, श्री वामन पालेकर, उपस्थित होते
