डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल ओरोस ची खेळाडू कु. सोनम तुषार काळसेकर प्रथम
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाय(थाय बॉक्सिंग) असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ जाने २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी थाय बॉक्सिंग या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी मा. विद्या शिरस मॅडम, क्रीडा मार्गदर्शक मा. माधुरी घराळ , क्रीडा अधिकारी मा. शितल शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाय(थाय बॉक्सिंग) असोसिएशन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष लेफ्टनंट विवेक राणे व पत्रकार श्रीम. तेजस्वी काळसेकर मॅडम उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन बॅडमिंटन पटू व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. उदय जांभवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आयुष्यामध्ये शारीरिक फिटनेसला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे दररोज व्यायाम करणे व आपले शरीर सुदृढ ठेवणे महत्त्वाचे आहे असे श्री. जांभवडेकर यांनी उद्घाटन प्रसंगी म्हणाले . आपण ओरोस मध्ये ‘फिट फ्रेंड्स’ या नावाने जिम चालवतो जेणेकरून तरुण वर्ग व्यायामाकडे वळेल व भावी आदर्श पिढी तयार होईल त्यामुळे नियमित व्यायाम करा असे आवाहन श्री. जांभवडेकर यांनी सर्व खेळाडूंना केले.
सदर स्पर्धेमध्ये 36 किलो वजनी गटात कु. संदीप कुमार धर्मेंद्र प्रसाद (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम, कु. दुर्वेश चंद्रकांत साटम (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला द्वितीय व समर्थ मल्लिकार्जुन लवटे (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
40 ते 44 किलो वजनी गटामध्ये कु. जयेश विश्वनाथ राणे (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम, मयूर पद्माकर चव्हाण (भ.ता. चव्हाण. म. मा. विदया चौके ) याला द्वितीय, रंजीत कुमार धर्मेंद्र प्रसाद (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
44 ते 48 किलो वजनी गटात कु. विनय राजेंद्र वालावलकर (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
48 ते 52 किलो वजनी गटात कु. भरतकुमार सुकाराम प्रजापत (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये 32 ते 36 वजनी गटात कु. श्रेया प्रमोद यादव (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) हीला प्रथम, कु. वेदा गणेश खोत (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली)हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
36 ते 40 किलो वजनी गटांमध्ये कु. ज्ञानपरी किसन ठोंबरे (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) हिला प्रथम व कु. किमया प्रशांत चव्हाण (भ.ता. चव्हाण. म. मा. विदया चौके )हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
40 ते 44 किलो वजनी गटात कु. आर्या अक्षय पाटकर (भ.ता. चव्हाण. म. मा. विदया चौके ) हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
48 ते 52 किलो वजनी गटात कु. रिद्धी संदीप कांबळी (भ.ता. चव्हाण. म. मा. विदया चौके ) हिला प्रथम क्रमांक व कु. डिंपल कुमारी सखाराम प्रजापत (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
19 वर्षाखालील मुलींच्या 52 ते 60 वजनी गटांमध्ये डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल ओरोस ची खेळाडू कु. सोनम तुषार काळसेकर हिचा प्रथम क्रमांक आला.
पंच म्हणून कु. चित्राक्षा मूळये, कु. मृणाल मलये, कु. मारिया आल्मेडा, कु. नितेश गुप्ता, कु. मंगेश गुरव यांनी काम पाहिले.
यशस्वी खेळाडूंचे पूर्ण जिल्हाभर कौतुक होत आहे.
