वैभववाडी प्रतिनिधी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या दिनदर्शिका-२०२५ चे विमोचन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक सभा अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी परिषदेच्या सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीम. आरती देसाई, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सहसचिव, जिल्हाध्यक्ष व अशासकीय सदस्य प्रा.एस.एन. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष व अशासकीय सदस्य सीताराम कुडतरकर, जिल्हा संघटक व अशासकीय सदस्य विष्णुप्रसाद दळवी, वैभववाडी तालुका अध्यक्ष व अशासकीय सदस्य तेजस साळुंखे, परिषदेचे शासकीय सदस्य प्रतिनिधी, विविध प्रवर्गातील अशासकीय सदस्य व पुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे अभिनंदन करुन कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या. उपस्थित शासकीय व अशासकीय सदस्य यांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
