जिल्हा पत्रकार संघ आणि मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने दिवंगत पत्रकार प्रवीण मांजरेकर यांना आदरांजली
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
प्रवीण मांजरेकरां सारखे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपणं गमावले आहे.घडलेली घटना अनपेक्षित व दुःख दायक आहे .पत्रकारीते बरोबरच नाट्य, क्रीडा,सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेणारे व स्वतःला झोकून देऊन काम करणारे असे मांजरेकर हे व्यक्तिमत्व होते .काल पर्यंत आपल्या सोबत काम करणारा सहकारी आज आपल्या सोबत नाही,ही भावना खूप वेदनादायी आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये प्रवीण यांचा सहभागा फार महत्त्वाचा होता. आपण आपला महत्त्वाचा असा पदाधिकारी गमावला याचे मोठे दुःख आहे असे मनोगत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवनांमध्ये दिवंगत प्रवीण मांजरेकर यांच्यासाठी शोक सभा ठेवण्यात आली होती. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर बोलत होते. यावेळी सचिव बाळ खडपकर, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, चंद्रकांत सामंत, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आनंद लोके,बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर,संतोष राऊळ ,किशोर जैतापकर, संतोष सावंत,सदस्य राजन नाईक,लवू म्हाडेश्वर,लक्ष्मीकांत भावे,अमित खोत,प्रशांत वाडेकर,महेंद्र मातोंडकर,सुहास देसाई,देवयानी वरस्कर ,संजय वालावलकर, दत्तप्रसाद वालावलकर, प्रमोद महाडगूत, विनोद दळवी, तेजस्वी काळसेकर, विनोद परब, गिरीश परब, मनोज वारंग, नंदकुमार आयरे, यांसह जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य तसेच मुख्यालय पत्रकार संघाचे पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बाळ खडपकर, गजानन नाईक, तेजस्वी काळसेकर, संदीप गावडे, अमित खोत, गणेश जेठे, आनंद लोके,दत्तप्रसाद वालावलकर आदींनी या अशोक सभेत आपली मनोगते व्यक्त केली. पत्रकार आणि नाट्यकरमी त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे आणि क्रिकेटच्या मैदानातच ज्यांनी आपला देह ठेवला ते दिवंगत पत्रकार प्रवीण मांजरेकर यांच्या बद्दलच्या अनुभवाने पूर्ण सभागृह शोकाकूल झाले होते. प्रवीण मांजरेकर यांच्या जाण्याने जिल्हा पत्रकार संघाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केल्या. व त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.सुरुवातीला प्रवीण मांजरेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फुले वाहण्यात झाली. तसेच स्तब्ध राहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी सर्वांकडून प्रार्थना करण्यात आली.
